नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी मा.चंद्रशेखर देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले.त्यात म्हंटले आहे की ,चांदवड तालुक्यात गेल्या एक ते दिड महीण्यापासुन सतत पडणार्या पावसामुळे शेतकर्याचे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात मका, टोमॅटो ,सोयाबीन, कांद्याचे रोपं, सिमला, भाजीपाला अशा प्रमुख पिकांचा समावेश आहे .
अशा होणार्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळून द्यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस विजय जाधव शहराध्यक्ष प्रकाश शेळके, युवक ता.अध्यक्ष दत्ता वाघचौरे ,नगरसेवक नवनाथ आहेर , डॉ.दिलीप शिंदे, तुकाराम सोनवणे, मतिन घासी ,विजूनाना गांगर्डे , भुषण शेळके ,संदिप शिंदे ,चंगदेव खंगाल ,विक्की जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

