[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव येथे वंचित व दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दरेगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ‘घर घर तिरंगा’मोहिमेसाठी प्रभातफेरी

चांदवड तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा ,दरेगाव येथे आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ‘घर घर तिरंगा’मोहिमेसाठी प्रभातफेरी काढण्यात आली .आजपासून घरोघरी राष्ट्रध्वज फडकाविण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समितीने उभारलेल्या मदतनीधीतून वंचित व दूर्बल घटकातील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपही आज करण्यात आले,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नूतन पगार,उपाध्यक्षा सौ.मनिषा गांगुर्डे,सदस्य श्री,बाबाजी पगार ,विक्रम देवरे, सुकदेव पगार, देविदास अहिरे ,दीपक देवरे, दतु पगार, नवनाथ पगारआदी उपस्थित होते. तसेच सरपंच श्री.अमोल देवरे आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.आज नृत्यस्पर्धा व रांगोळी स्पर्धाही शाळेत संपन्न झाल्या.


आजचे ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थिनी कु.सिद्धी समाधान गांगुर्डे हिच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे यांनी केले तर श्री.रविराज पाटील व श्री.दीपककुमार निकम यांनी सूत्रसंचलन केले.श्री.साहेबराव देवरे,श्रीमती शोभना बिरारी,श्रीमती सरला आहेर,श्री,रमेश राऊत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
श्रीमती बोरसे मॕडम,श्रीमती वैशाली पवार यांनी कार्यक्रमाचे सांयोजन केले तर श्री.बाळासाहेब सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी पोलीस पाटील श्री.समाधान गांगुर्डे यांनी ध्वजसांहितेबाबत माहिती देवून घर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

दरेगाव येथे आयोजित करण्यात आलेली रांगोळी स्पर्धा

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या