येवला ( प्रतिनिधी ) : -महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग आणि ग्रामपंचायत कातरणी व विकासे. सह. सोसायटी कातरणी यांचे संयुक्त विद्यमाने ‘सुधारित कांदा लागवड तंत्रज्ञान ‘या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कातरणी गावच्या सरपंच सौ सरलाताई अंबादास सोनवणे या होत्या . सदर कार्यक्रमास डॉ प्रमोद पाचणकर, कांदा पैदासकार ,कांदा साठवण संशोधन प्रकल्प म.फु.कृ.वि राहुरी तसेच कृषी संशोधन केंद्र निफाड येथील गहू विशेषज्ञ डॉ सुरेश दोडके, डॉ योगेश पाटील, डॉ भानुदास गमे ,श्री भालचंद्र म्हस्के या शास्त्रज्ञांनी सुधारित कांदा उत्पादन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास डॉ. रोहित निरगुडे, क्षेत्र अधिकारी , डॉ कुंडलिक जाधव ,वरिष्ठ संशोधन सहाय्यक, पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग ,म फु कृ वि,राहुरी यांचे मार्गदर्शन लाभले. उत्पादन खर्चात बचत करुन पीक उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा रोपवाटिका व्यवस्थापन, शिफारशीनुसार माती परीक्षण अहवालावर आधारित कांदा पिकाचे खत व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान ,कीड व रोग नियंत्रण याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलणे आवश्यक असून खरीप कांदा रोप गादीवाफ्यावर तयार करावी, मुख्य अन्नद्रव्य बरोबर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ,विद्राव्य खतांचा वापर ,जैविक खते व बुरशीनाशकांचा वापर योग्य वाण निवड ही चर्चा सत्रातील महत्त्वाचे मुद्दे होती. मंडळ कृषी अधिकारी,पाटोदा श्री क्षीरसागर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माजी सरपंच श्री योगेश पाटील यांना नवराष्ट्र चा आदर्श सरपंच सम्राट पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .सदर कार्यक्रमास श्री लक्ष्मण गंगाधर कदम ,श्री गोवर्धन सिताराम कदम ,श्री पंढरीनाथ त्रंबक कदम यांच्यासह शेतकरी बंधूंनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला .सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता क्षेत्र पर्यवेक्षक, के.टी. चौरे, कृषी सहाय्यक माहुलकर ए.बी., सोनवणे आर.पी., खांडेकर व्ही.एस, गोसावी एस. एस व शेतकरी बंधू आदींनी परिश्रम घेतले. ढुमणे वाय.एस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .मोहन मधुकर कदम, उपसरपंच ,ग्रामपंचायत कातरणी यांनी अध्यक्षाच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सदर मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल असे सांगितले अंबादास कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

