[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे आराध्यदैवत कै.देवाजी नाना गांगुर्डे यांच्या नावाने चांदवड तालुका प्राथ.शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड यांच्या वतीने दिले जाणारे शिक्षकरत्न पुरस्कार सन 2022 साठी नुकत्याच झालेल्या बैठकीत पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गांगुर्डे, व्हा.चेअरमन श्री. संजय खांगळ व सर्व संचालक मंडळ यांनी सविस्तर चर्चा करून सर्वांनुमते खालीलप्रमाणे उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली.
1)श्री नंदलाल नारायण पगार शाळा-पाथरशेंबे
2)श्री शिवाजी पोपट खैरनार शाळा-सोग्रस
3)श्री प्रशांत जगन्नाथ देवरे शाळा-उसवाड
4)श्री शहानवाज हसन बागवान शाळा-कोलटेक
5)श्रीम.सविता ठाणसिंग दातरे शाळा-बोराळे 6)श्रीम.शितल नानाजी देसले शाळा-मंगरूळ
निवड झालेल्या गुणवंत शिक्षक बंधु-भागिनींचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते मा.श्री.काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष मा.श्री.केदुजी देशमाने,राज्य सल्लागार श्री दादाजी सावंत जिल्हा कोषाध्यक्ष श्री. साहेबराव पवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री बुधेसिंग ठोके,तालुका नेते श्री शिवाजी शिंदे,तालुका अध्यक्ष श्री श्रीकांत देवरे,सरचिटणीस श्री मुकुंद भोजने,चेअरमन श्री.किरण गांगुर्डे व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 28/ 8/2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत चांदवड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात होईल.तरी बहुसंख्य सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.

 

दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने चांदवड तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.जेणेकरुन गुरुजणांमध्ये नवचेतना निर्माण होऊन शिक्षक अजून जोमाने कामकाज करु लागतात

श्री.किरण गांगुर्डे
चेअरमन
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या