[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे अतिवृष्टी झाल्याने केटीवेअर बंधारा फुटल्याने नदीला प्रचंड पुर. अनेक गावांमध्ये पावसाचे थैमान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

गंगावे व पन्हाळे गावांमधील असलेल्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही गावांचा पाण्यामुळे जाण्या येण्याचा संपर्क तुटलेला आहे. मेसनखेडे बू येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जेजुरे वस्ती, पगारे वस्ती ,थोरात वस्ती जवळील नदी दुथडी भरून वाहत आहे .

चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे अतिवृष्टी झाल्याने केटीवेअर बंधारा फुटल्याने नदीला प्रचंड पुर. अनेक गावांमध्ये पावसाचे थैमान

चांदवड तालुक्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील विविध गावांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला विविध ठिकाणच्या नद्यांना महापूर आले विशेषता चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी परिसरात अचानक मोठ्या सदस्य पावसाने हजेरी लावल्याने नदीवरील सिमेंट किती वेळ बंधारातील पाणी साठवण क्षमता संपल्याने इतरत्र करून बंधारा फुटल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सुरू झाले सदर पाणी नदीपात्रात मावत नसल्याने इतरत्र शेतात घुसले सदर नदी च्या कार्यक्षेत्रातील पिंपळगाव ढबळी रायपूर बडाने वागदर्डी आदी गावांमध्ये पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे सदर प्रांजल नदीचे पाणी हे वागदर्डी धरणाला मिळते मात्र नदीकाठच्या गावांना या पाण्याने धोका निर्माण झाला आहे. अजून पाण्याने हजेरी लावली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे. गंगावे व पन्हाळे गावांमधील असलेल्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही गावांचा पाण्यामुळे जाण्या येण्याचा संपर्क तुटलेला आहे. मेसनखेडे बू येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जेजुरे वस्ती, पगारे वस्ती ,थोरात वस्ती जवळील नदी दुथडी भरून वाहत आहे . पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .

टोमॅटो, मका , बाजरीचे पिक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे .हाता तोंडाशी आलेले पिक हिरावून घेतले आहे आहे . तसेच कांद्याच्या रोपाचे आतोणात नुकसान झाले आहे . मेसन खेडे परिसरात आज रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे तरी लवकरात लवकर पाहणी करून सरकारने सरसकट मदत करावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब पगारे वा संतोष थोरात यांनी केले आहे . वडगांव परिसरात लोंच्ययाचे डोंगर आणि फॉरेस्ट वर जोरदार पाऊस झाला. कांडेकर बंधाराची साठवण क्षमता संपत चालली आहे काही ठिकाणी भेगा पडत आहे .हे पाणी तीन मोरी मध्ये बसू शकतं नाही सर्व विदारक परिस्थिती आहे . वडगांव येथील माजी सरपंच दिगंबर बाळू चव्हाण ,बाळू भास्कर चव्हाण ,काशिनाथ अंबु ठाकरे , राजुबाई मधुकर खताळ, मच्छिंद्र लहू माकुने यांचे घरांची भिंत पडझड झाली असून अन्य ठिकाणीही अतोनात नुकसान होत आहे. दरेगाव बारी ते मेसणखेडे येथील मेसन्या डोगर परिसरातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नद्या ओसंडून वहात होत्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या