[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कर्मवीर राजाराम सखाराम वाघ जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेला उत्साहात सुरुवात

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 27 व्या वर्षी करण्यात आले होते

कर्मवीर राजाराम सखाराम वाघ जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेला उत्साहात सुरुवात

दिंडोरी प्रतिनिधी शालेय जीवनात ज्या विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेतून बोलण्याची संधी मिळाली असे अनेक विद्यार्थी भावी काळात उत्तम वक्ते म्हणून तयार होतात शालेय वकृत्व स्पर्धेतून अशा व त्यांची जडणघडण होते म्हणून पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास मुलांना वकृत्व कलेची आवड व प्रेरणा मिळेल वकृत्व कलही मानसन्मान व अर्थार्जण देणारी आहे असे मत कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कर्मवीर रासवाघ शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषराव शिंदे यांनी कादवा कारखाने ते जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना व्यक्त केले

कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील बीके कावळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 27 व्या वर्षी करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन कादवा कारखानाचे पदाधिकारी सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून संपन्न झाले यावेळी कादवा कारखानाचे संचालक मधुकर गटकळ दादासाहेब पाटील दिनकरराव जाधव कवी विठ्ठल व संधान साहित्यिक विजय मिठे अशोकराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचे प्रास्ताविक प्राचार्य बीके शेवाळे तर स्वागत पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव विभाग प्रमुख बाळासाहेब वडजे यांनी केले स्वागत गीत मंच व संगीतशिक्षक बगाड व मार्कड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले
उद्घाटन समारंभ नंतर कवी विठ्ठल संधान साहित्यिक विजय मिठे यांनी मनोगत व्यक्त करताना वकृत्व स्पर्धेची आजच्या काळात नितांत गरज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी बोलणं ही एक कला आहे सध्याच्या युगात सूत्रसंचालन हा एक महत्त्वाचा धागा प्रत्येक कार्यक्रमात कार्यक्रमाची उंची वाढवतो शालेय जीवनात वकृत्व स्पर्धेमधून विद्यार्थ्यांची वकृत्वाची जडणघडण होते व भविष्यात हेच विद्यार्थी उत्तम वक्ता व सूत्रसंचालक म्हणून नावारूपास येतात म्हणून पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुरेश भुसाळ यांनी केले स्पर्धा विभाग प्रमुख सुरेश सलादे यांनी आभार मानले नाशिक जिल्ह्यातून या नावाजलेल्या स्पर्धेत 40 शाळांचे एकूण 90 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर रास वाघ शिक्षण संस्थे चे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाष शिंदे सचिव बाळासाहेब उगले व संचालक मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केलेले असून बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शेवाळे सर पर्यवेक्षिका व्ही आर जाधव बाळासाहेब वडजे व विद्यालय या स्पर्धेचे संयोजक आहेत
या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावी आणि ज्युनिअर कॉलेज या चार गटात विजेत्यांना स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालानंतर नाशिक जिल्ह्यातील पहिली वकृत्व स्पर्धा म्हणून या स्पर्धेला शाळा व स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या