लोहोणेर जनता विद्यालयात सत्यशोधक समाज व्याख्यान मालेचे आयोजन
लोहोणेर- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात सत्यशोधक समाज संस्थेच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अतुल कासव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी हे होते तर पर्यवेक्षक बी.के.जाधव व शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यानंतर व्याख्याते अतुल कासव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ-लोहोणेर येथील जनता विद्यालयात सत्यशोधक समाज व्याख्यान मालेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना व्याख्याते अतुल कासव समवेत व्यासपीठावर उपस्थित मुख्याध्यापक वाय. यु.बैरागी, पर्यवेक्षक बी.के.जाधव व शिक्षक वृंद.(छाया-एस.बी. एखंडे)
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी यांनी ह्या व्याख्यान मालेचा उद्देश व पार्श्वभूमी समजून सांगितली. शेवटी व्याख्याते अतुल कासव यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास उलगडत महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याने संस्थेच्या उभारणीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीरांच्या कार्याची ओळख करून दिली.विद्यार्थ्यांवर योग्य त्या वयात संस्कार व्हावे व ते संस्कार म्हणजे सत्यशोधक समाजाचे संस्कार आणि ते होण्याच्या दृष्टीने सदर व्याख्यान मालेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन छोटू वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल एखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले.

