[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथे तत्काळ पिकनुकानग्रस्तांचे पंचनामे सुरू.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिंगवे येथे तत्काळ पिकनुकानग्रस्तांचे पंचनामे सुरू.

शिंगवे गावातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहान करण्यात आले आहे की, अनेक दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वच शेतकरी बांधवांचे कांदा सोयाबीन मका व इतर पिकांचे अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे या संदर्भात आमदार डॉराहुल दादा आहेर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे तरी सर्व शेतकरी बांधवांचे सरसकट पंचनामे करायचे आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना व ज्यांचा पंचनामा झाला आहे व ज्यांनी सही केली आहे त्यांना येण्याची गरज नाही परंतु ज्यांचा पंचनामा झाला नाही त्या शेतकरी बांधवांनी येऊन आपला पंचनामा करून घ्यावा व आपल्या नावापुढे सही किंवा अंगठा करायचा आहे अशी आपणा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात आली आहे.

याप्रसंगी शिंगवे येथील खताळ झाल्टे वरे शिंदे बोरसे गुंड म् ढे पाटील संत पवार कदम डावरे वस्तीवरील शेतकरी बांधव पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते . कुषी सहायक प्रवीण चोधरी यांनी पंचनामे केले. यावेळी माजी सरपंच तुकाराम खताळ ,भिकाजी मढे, भागवत पाटील , किरण बोरसे,धोंडीराम गुंड, बाबाजी मढे रामा खताळ ,अर्जुन मढे ,संदीप गुंड, पंडित बोरसे, बापू मढे ,आत्माराम खताळ ,भाऊसाहेब बोरसे ,अण्णा झाल्टे ,जयराम खताळ, शरद गुंड ,खाजाभाई शेख ,संजय ठाकरे ,अनिल कुलकर्णी, हरी झाल्टे ,दादा गुंड ,गोरख वरे ,भानुदास गुंड ,सचिन खताळ, खंडू गुंड, अनिल मढे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या