[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचे जयंतीचे दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत मनमाड मंडळात सेवा पंधरवाडा आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचे जयंतीचे दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत मनमाड मंडळात सेवा पंधरवाडा आयोजन

 

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचे जयंतीचे दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सेवा पंधरवाडा आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान सेवा पंधरवाडा अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी मनमाड चे अंतर्गत गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यात महाडीबीटी अंतर्गत विविध घटकांचे शेतकरी बांधवांचे अर्ज ऑनलाईन भरणे, पिकांवरील विविध कीड व रोग व त्यावरील उपाय योजना याकरिता कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांचे प्रशिक्षण, महाडीबीटी अंतर्गत लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी खरेदी केलेल्या घटकांचे तातडीने तपासणी करून प्रस्ताव अनुदान मंजुरीचे कार्यवाहीसाठी सादर करणे. पी एम किसान अंतर्गत ई केवायसी पूर्ण करणे. विविध बाबनिहाय घटकांचे प्रशिक्षणामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. माहिती देऊन प्रचार व प्रसिद्धी करणे. मनमाड मंडळातील माळेगाव कर्यात, कर्ही, एकवै, सटाणे , वडाळी खुर्द, बुद्रुक, भौरी भालुर या गावात सेवा पंधरवडा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक, संजय डोमाडे , वीरेंद्र तवले, व कृषी पर्यवेक्षक, श्री संजय पवार यांचे मार्फत होत आहे. तालुका कृषी अधिकारी, नांदगाव जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या