[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुगाव गावाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे : – माजी सरपंच प्रकाश सोनवणे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दुगाव गावाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे : – माजी सरपंच प्रकाश सोनवणे

 

चांदवड तालुक्यातील दुगाव हे मोठे गाव असून या गावात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .मागे २१ स्पटेबर रोजी पिंपळगाव येथील बंधारा फुटला त्यावेळेस या दुगावचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीकडून पहानीची अपेक्षा असताना मात्र कोणीही आले नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे ,अशी मागणी दुगाव या गावचे माजी सरपंच प्रकाश भिकाजी सोनवणे यांनी केली आहे.

आपले स्वतःचे अनुभव कथन करताना त्यांनी सांगितले की त्या दिवशी दुगांव येथें माझ्या मळ्यात रानमळा परिसरात ढगफुटी झाली पाझर तलाव फुल होऊन फुटायला फक्त दोन फूट बाकी होता, आम्ही जीव मुठीत धरून गावात निघून गेलो, रात्र गावात काढली, पिकांचे अतोनात नुकसान झाले .मात्र ना दुगांवच नाव कुठे, ना बातमी, लोकप्रतिनिधी सगळीकडे फिरतात. मात्र दुगांवला ना कोणी कार्यकर्ता ना कोणी पुढारी ? याची आम्हाला खंत वाटते.

आमच्या गावात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करायला स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी प्रतिनिधी , तालुक्यातील नेते, किंवा आगामी दुगाव गटात इच्छुक असणारे नेते कोणीच गावात फिरकले नाही.याच उत्तर आम्ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नक्कीच देऊ, असे प्रकाश भिकाजी सोनवणे यांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या