[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मैत्रेय ग्राहक व प्रतिनिधींचे इगतपुरी येथे धरणे आंदोलन

मैत्रेय ग्राहक व प्रतिनिधींचे इगतपुरी येथे धरणे आंदोलन

ईगतपुरी – (नवनाथ गायकर )-

सन2 2014 मध्ये मैत्रेय कंपनीने गाशा गुंडाळला म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चेअरमन विरोधात गुन्हा दाखल करुण अटक देखील झाली होती मात्र त्यानंतर लोकांचे पैसे स्थावर मालमत्ता विकुन देवू या अटी घालत जामिनावर सुटका करुन घेतली परंतु आठ वर्ष झाली कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे अजुन कोणतीही कारवाई नाही त्यामुळे मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीचे औचित्य साधत इगतपुरी तहसील कार्यालय येथे धरण धरत आंदोलन करण्यात आले

यावेळी या आंदोलनाची दखल घेत इगतपुरी मतदरसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली व आंदोलनकर्त्यांचे गार्हाणे ऐकून घेत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ह्या प्रश्नावर लक्षवेधी करणार असून आपण ग्राहकांचे पैसे मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांच्या सोबत असल्याचे आ खोसकर यांनी सांगितले या आंदोलनासाठी नारायण बाबा जाधव,मथुरा जाधव,भगीरथ म्हसने,विलास रूपवते,भगीरथ आडोळे,शोभा जाधव,अनिता निकम, संगीता मोरे,सत्यभामा शिंदे,कविता पवार,संदीप आरोटे,नंदू जाधव,आबा भटाटे यांच्यासह शेकडो महिला व प्रतिनिधि उपस्थित होते

मैत्रेय प्रकरण गेल्या आठ वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे कंपनीची चारशे ठिकाणची प्रॉपर्टी सरकारने ताब्यात घेतली आहे इथपर्यंत यश असोसिएशनला मिळालं आहे मात्र या सरकारने या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करुन गोरगरीब जनतेच्या घामाचा पैसा मिळवून द्यावा – भास्करराव गुंजाळ
सचिव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

 

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या