दरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान प्रथमच ७४ व्यां प्रजासत्ताक दिनानिमित्त मिळाला अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचाला
दरेगांव : -. चांदवड तालुक्यातील दरेगांव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

दरेगांव येथे सकाळी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व विकास माध्यमिक विद्यालयातर्फ गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण नूतन सरपंच सौ. सरला जालींदर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे दरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच अनुसूचित जमातीच्या महिलेला मिळाला आहे .
विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण ॲड. समाधान गव्हाणे ,विकास माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण सैनिक जालिंदर साहेबराव आहिरे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण सुकदेव पगार व सैनिक जालिंदर आहिरे व आयुर्वेदीक दवाखान्याचे ध्वजारोहण उपसरपंच सोमनाथ देवरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत सादर करण्यात आले. विकास माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ध्वजारोहणाप्रसंगी कृष्ठरोग निवारण शपथ घेण्यात आली. 
दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने आयोजित केलेले विद्यार्थ्यांचे लेझीम संचलन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ लक्षवेधक ठरला.
मुख्य ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नूतन किरण पगार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश श्री.वसीम शेख उपस्थित होते . 

शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी लक्षवेधक लेझीम संचलन केले व देशभक्तीपर नृत्य सादर केले.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रोख रकमेची बक्षिसे देऊन शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गौरविण्यात आले.
सरपंच सौ.सरला पवार व शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.मनिषा गांगुर्डे,सदस्या सौ.ठकूबाई पगार व महिला सदस्यांनी ध्वजपुजन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्री.वसिम शेख, सरपंच सरला पवार ,उपसरपंच सोमनाथ देवरे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य संजय जाधव, विक्रम देवरे , सोसायटी चेअरमन भाऊसाहेब गांगुर्डे , माजी सरपंच नथू देवरे, माजी चेअरमन भाऊसाहेब देवरे , अनिल गव्हाणे, अरुण गांगुर्डे, निवृत्ती आहिरे, विनोद गांगुर्डे, समाधान देवरे, ,योगिता गांगुर्डे,मंदा पगार , बाबाजी देवरे,नवनाथ गांगुर्डे, ,भाऊसाहेब जाधव, उत्तम गांगुर्डे, माधव देवरे, विक्रम गांगुर्डे, अंबादास देवरे, उत्तम पगार, दिनेश पगार, दत्तू पगार, दिपक आहेर, रावसाहेब देवरे , मधुकर परदेशी, राकेश गांगुर्डे, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते . तसेच
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य विक्रम देवरे ,श्री.प्रवीण देवरे,बाबाजी पगार,बाबाजी देवरे , ,देविदास अहिरे, पोलिस पाटील श्री.समाधान गांगुर्डे ,तलाठी सौरभ पिसोळकर , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रजपूत मॅडम, एकनाथ पगार, रविंद्र गांगुर्डे, विक्रम पगार , व अन्य मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे यांनी केले तर श्रीमती बिरारी,श्री.बाळासाहेब सावंत ,श्री.साहेबराव देवरे,श्री.रमेश राऊत ,श्रीमती सरला अहिरे,श्रीमती वाल्याबाई बोरसे,श्रीमती.वैशाली पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर पदवीधर शिक्षक श्री.रविराज पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षणासाठी श्री.निवृत्ती अहिरे व प्रवीण देवरे यांनी विशेष मार्गदर्शन वर्ग निशुल्क घेणार असल्याचे याप्रसंगी सांगितले तर गुणवंत विद्यार्थांसाठी कायमस्वरुपी बक्षिस योजना राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
उपशिक्षक श्री.दीपककुमार निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सोसायटी कर्मचारी , प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, व ग्रामस्थ उपस्थित होते.

