[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आ. डॉ. आहेर यांना गिडगे वस्ती रस्ता आणि निमोण ते दहेगाव रस्ता डांबरीकरण करण्यात यावे यासाठी निमोण ग्रामस्थांचे निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आ. डॉ. आहेर यांना गिडगे वस्ती रस्ता आणि निमोण ते दहेगाव रस्ता डांबरीकरण करण्यात यावे यासाठी निमोण ग्रामस्थांचे निवेदन

चांदवड- आमदार डॉ. राहुल आहेर यांना गिडगे वस्ती रस्ता आणि निमोण ते दहेगाव रस्ता डांबरीकरण करण्यात यावे या संदर्भात निवेदन दिले. यावेळी सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.यात गिडगे वस्ती रस्ता प्रथमता करण्याचे आश्वासन निमोण येथिल शिष्टमंडळाला दिले. त्याबद्दल निमोनचे सरपंच यांनी सर्व निमोण गावकऱ्यांतर्फे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आभार मानले.
तसेच आ.आहेर यांनी जाधव कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे , निमोण येथील प्रतिनिधी डॉक्टर भाऊराव देवरे ,हनुमान रतन दखणे ,उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय मुरलीधर सोनवणे ,रतन दखणे, हिरामण देवरे, कांतीलाल निकम , वाल्मीक देवरे ,दादाजी देवरे ,विष्णू सोनवणे ,भास्कर देवरे, चिंधा सोनवणे, एकनाथ देवरे ,अंबादास देवरे तसेच दहेगावचे सरपंच गजानन पगारे , नरेंद्र कलवर व त्यांचे सर्व सदस्य उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या