ग्रामपंचायतीमध्ये मोठी ताकद असते काम थांबवणे अवघड नाही तर काम करणे अवघड असते त्यासाठी सतत पाठपुरावा करून विकासकामे करण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढे यावे: – आ. डॉ. राहुलदादा आहेर
राजकारणात जो पाऊल ठेवतो तो काम करण्यासाठी…… ग्रामपंचायत मोठी ताकद असते , जगातील सर्वात अवघड निवडणूक जर कोणती असेल तर ती ग्रामपंचायतीची असते , ही लढाई जो जिंकेल , त्याला पुढील पंचायत समिती ,जिल्हा परिषद व इतर लढाया अत्यंत सोप्या वाटतात . एखादे काम थांबवणे अवघड नाही पण काम करने अवघड असते , काम करताना कमीपणा वाटू देऊ नये सतत पाठपुरावा करून सत्काराबरोबर काम करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे ,
लवकरच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचेही डॉ.राहुलदादा आहेर यांनी चांदवड तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात सांगितले.चांदवड तालुक्यातील नवनिर्वाचित
सरपंच, उपसरपंच,व सदस्य यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
यावेळी भाजपा नेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, श्री.भूषण कासलीवाल, तालुकाअध्यक्ष श्री.मनोज शिंदे, अॅड. शांताराम भवर, डॉ. नितीन गांगुर्डे, श्री.बाळासाहेब माळी, श्री.विलास दादा ढोमसे, श्री.सुनील शेलार, श्री.बाळासाहेब वाघ, श्री.अशोक काका व्यवहारे, श्री.टि.पी. निकम, विक्रमबाबा मार्कंड, श्री.निवृत्ती शिंदे, अशोक भोसले,सौ. गीताताई झाल्टे, सौ.स्वाती देवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाप्रसंगी बोलताना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले की,पहिल्या वेळेस जो निवडून आलेला असतो तो शिकू शकतो याआधी निवडून आलेले आहे ते ग्रामसेवकाला विचारू शकत नाही की मला ही माहिती द्या कारण त्यामुळे त्याचे अज्ञान उघडे पडते, नव्याने निवडून आलेल्यांनी ही संधी घ्यावी, आणि आपण शिकून घ्यावे अज्ञान हे कधीही लपून राहत नाही ते कधी ना कधी उघडं होईलच, काही लोक म्हणतात सरपंचाला काय कळते मी ही निवडून आलो तेव्हा मलाही म्हणायचे आमदाराला काय कळते आपण जर ते काम शिकलो , खोलामध्ये गेलो तरच आपण तिथे काम करू शकतो. जर आपण वरवर काम करत राहिलं तर पुढल्या दोन महिन्यांमध्ये प्रत्येक जण मला भेटायला येतील व मला ग्रामसेवक बदलून द्या अशी मागणी करतील, मात्र तसे न करता आपण प्रयत्न केले तरच आपण तिथे काम करू शकतो. नितीनदादांनी जो विषय घेतला तो आपण लवकरच पूर्ण करू. नवीन सदस्यांचे प्रशिक्षण लवकरच ते आयोजित करून तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे सुद्धा प्रशिक्षण घेऊ . प्रशिक्षण झाले तर तुमचा आणि माझा दोघांचाही भार कमी होईल तुम्हाला जर माहिती पडलं कसं काम करायचं तर माझ्यापर्यंत येण्याची गरज पडणार नाही नाहीतर ग्रामपंचायतचे काम कसं करायचं त्यासाठी माझ्यापर्यंत काही येत असतात त्यामुळे प्रशिक्षणचा निश्चितच सर्वांना फायदा होईल. राजकारणात जो पाऊल ठेवतो तो काम करण्यासाठी , ग्रामपंचायत मध्ये मोठी ताकद असते .जगातील सर्वात अवघड निवडणूक जर कोणती असेल तर ती ग्रामपंचायत असते ही लढाई जो जिंकेल , त्याला पुढील पंचायत समिती ,जिल्हा परिषद व इतर लढाया अत्यंत सोप्या वाटतात. नवनिर्वाचितानी वीज ,पाणी आणि घर या गोष्टींवर लक्ष द्यावे. 2024 पर्यंत ज्याला राहायला छत नाही अशा प्रत्येक कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळणार आहे .तसेच घरासाठी नळाद्वारे प्रत्येक घरात पाणी मिळणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतकडे गावठाणाची जागा आहे त्यांनी तेथे सोलर पार्क योजना राबवली तर शासन तेथे सोलर पार्क उभे करेल. शिवाय त्याचा फायदा गावाला होणार असून गावाला बारा तास विज मिळेल तसेच जलयुक्तसुधार योजना पुन्हा सुरू होत आहे तीही मोठ्या प्रमाणात राबवावी. नव्याने निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मी अभिनंदन करतो , काम थांबवणे अवघड नाही तर काम करणे अवघड असते .काम सांगताना कमीपणा वाटू देऊ नका , सतत पाठपुरावा करावा लागतो .मलाही शासन दरबारी पाठपुरावा करावा लागतो . सत्काराबरोबरच काम करण्यासाठी पुढे राहावे. असे प्रतिपादन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांनी चांदवड येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात झालेल्या नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले . तत्पूर्वी चांदवड बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , तुमचा अभ्यास चांगला असेल तर कितीही अडचण असली तरी त्याला अडचण येत नाही .आताचे सर्वच सरपंच नशीबवान आहेत , कारण त्यांना पाच वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे . 14 वा वित्त आयोग 15 वां वित्त आयोगाच्या निधी बरोबरच ग्रामपंचायतसाठी 1144 योजना आहेत तसेच रोजगार हमी योजनेतून आपण कोट्यावधी रुपयांची कामे करू शकतो .आदर्श गाव बनवायचे असेल तर सरपंच यांनीही आदर्श होणे गरजेचे आहे. चांदवड बाजार समितीचे माजी उपसभापती व वडाळीभोईचे सरपंच नितींनदादा आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तालुक्यातील सर्व नवीन सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्याचे आवाहन आमदार डॉ. आहेर यांना केले . तसेच काम करताना सर्वांनी मोठेपणा विसरला पाहिजे . कुठेही अज्ञानपण लपवून ठेवू नये . जे काम करायचे आहे ते सर्वांना सोबत घेऊन करावे हेतु तुमचा प्रामाणिक असेल तर उशिरा का होईना त्याला न्याय मिळतो यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या गीताताई झाल्टे ,. चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण भाऊ कासलीवाल,चांदवड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे , खडक ओझर येथील सरपंच सागर जाधव ,भाडगाव चे महाराज आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळेस सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शांताराम भवर यांनी केले. चांदवड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमधील विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचा सत्कार डॉक्टर राहुल आहेर व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बोपाने येथील पंधरा वर्षीय ओम शरद हांडगे यांनी सायकलवर नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल यांचा सत्कार सायकल देऊन करण्यात आला.

