चांदवड तालुक्यातील दरेगाव, शिंगवेसह इतर गावांची भुजल सर्वेक्षण यंत्रनेणे जाहिर केलेली सेमीक्रिटीकल झोनची बंदी उठवावी यासाठी आ. डॉ. आहेर यांना दरेगाव, शिंगवे येथील ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य व ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी
शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासन काही अटी व निकषांवर विहिर योजना राबविते. अनुसूचित नवबौध्द जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच अन्य सर्व घटकांतील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर योजना राबविण्यात येते. मात्र चांदवड तालुक्यातील अनेक गावे भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेने सेमी क्रिटीकल झोन मध्ये समाविष्ट केल्याने या विविध घटकातील शेतकऱ्यांना शासनाच्या सिंचन विहिर योजनेचा लाभ घेता येत नाही. फक्त सामुदायिक विहिर घेता येते. मात्र वैयक्तीक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यासाठी फक्त सेफ झोन मधील गावांनाच याचा लाभ मिळतो. त्यामुळे अनेक आर्थिक दृष्टया असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे. शेतीच्या सिंचनासाठी बहुतांश गावामध्ये पिके घेण्यासाठी विहिरी व्यतिरिक्त अन्य व्यवस्था कमी आहे. पाटाच्या पाण्याची सोय नाही, पर्जन्यमान कमी असते, वर्षांतून एकदा पिक निघते व त्यातही पाणी देण्याची सोय नसल्यास केवळ पावसाच्या पाण्यावर पिके जगवायची कशी यासारख्या विंवचनेत गरीब शेतकरी आहेत. सदर बंदीचा फटका फक्त गरीब शेतकऱ्यांना बसणार असून आर्थिक दृष्टया संपन्न शेतकऱ्यांकडे पाणी उपशासाठीच्या विहिरी, विंधन विहिरी, शेततळे यासारखी साधने असल्याने त्यांना मात्र समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे या गावातील भुजल विकास यंत्रणेने सेमी क्रिटीकल झोन मधील बंदी उठवून शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळवून द्यावा.
चांदवड तालुक्यातील आडगाव, आहेरखेडे, आसरखेडे, बहादूरी, भडाणे, भरविर, भाटगाव, भोयेगाव, बोपणे , बोराळे,चांदवड, चिखलआंबे,चिंचोले, दहेगाव मनमाड, दहिवड, दरेगाव, डोणगाव, दहयाने, धोंडगव्हाण, धोतरखेडे, दिघवद, डोंगरगाव, दूधखेडे, दुगाव, एकरुखे, गंगावे, गणूर, हरणूल, हरसूल, हट्टी, हिरापूर, हिवरखेडे, इंदिरा नगर, जैतापूर, जांबुटके, कळमदरे, कोकणखेडे, कानडगाव, कातरवाडी, काजीसांगवी, खडकजांब, काळखोडे, कुंदलगाव , मेसनखेडे खुर्द, मेसणखेडे बुद्रुक , नारायण खेडे ,नवापूर, निंबाळे निमगव्हाण, पन्हाळे ,पारेगाव, परसुल पाटे , पाथरशेबे ,पिंपळद ,पिंपळगाव धाबळी, पिंपळनेर, रायपूर, रेडगाव खुर्द , रापली, साळसाने ,शिंगवे,, शिरसाणे, शिवाजीनगर, शिवरे, सोनीसांगवी, सुतारखेडे तळेगावरोहि, तळवाडे,उसवाड, ऊर्धुळ, वाद, वडगाव पंगु, वडनेर भैरव, वागदर्डी, वाहेगाव साळ, वाकी बु, वाकी खु, वराडी, विटावे ही गावे सेमी क्रिटीकल झोन मध्ये असल्याने या गावात शासनाच्या योजने अंतर्गत वैयक्तीक विहिर घेण्यास बंदी असल्याने सदर बंदी उठवण्यासाठी शासनदरबारी आपण पाठपुरावा करावा तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या विहिर योजनेचा लक्षांक वाढवण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दरेगाव येथील सरपंच सौ. सरला जालिंदर पवार , शिंगवे येथील सरपंच श्री. आत्माराम खताळ ,. दरेगाव ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय दामू जाधव व सौ.वैशाली विक्रम देवरे , यांनी केली आहे. निवेदन सादर करताना चांदवड कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमबाबा मार्कंड, दरेगाव चे माजी सरपंच नथू देवरे, दरेगाव सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब देवरे, सोसायटी संचालक संजय गांगुर्डे , सोसायटी माजी चेअरमन विक्रम देवरे दत्तू पगार, जालिंदर पवार, शिंगवे येथील भारतीय जनता पार्टीचे चांदवड तालुका सोशल मीडिया विभाग प्रमुख किरण बोरसे , संजय बोरसे ,शिवाजी पाटील ,रामा खताळ ,बाळू खताळ ,नंदू खताळ ,रमण डावरे , सुनील काळे आदी उपस्थित होते. यावेळी आपण संबंधित यंत्रणेला फेरसर्वे करण्यासाठी लावणार असल्याचे आश्वासन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दरेगाव व शिंगवे येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

