दरेगाव येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी.
चांदवड तालुक्यातील दरेगांव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सालाबादाप्रमाणे जयंती उत्सव समिती अध्यक्ष समाधान आहिरे,अविनाश आहिरे व मयूर आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती पार पडली.
संत रोहिदास महाराज नियोजित जागेपासून संत रोहिदास महाराज रथ मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली व संपूर्ण गावातुन मिरवणूक काढुन कार्यक्रमाची सांगता नियोजित जागेवर करण्यात आली. यावेळी मिरवणुकीस प्रारंभ करण्यापूर्वी समाधान आहिरे,सपत्नीक संत रोहिदास महाराज प्रतीमेचे आरती करून मिरवणुकीस आरंभ करण्यात आली. व पुजन ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी घरोघरी महिलानीं प्रतीमेस व मूर्तीस पंचारतीने ओवाळून श्रीफळ वाढवण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पडली. 
यावेळी पोलीस पाटिल समाधान गांगुर्डे,उपसरपंच सोमनाथ देवरे ,सदस्य निवृत्ती आहिरे,राकेश गांगुर्डे,तंटामुक्ती अध्यक्ष रामदास पगार,यशवंत देवरे,भावराव गांगुर्डे ,गंगाधर आहिरे,प्रकाश आहिरे,फुलचंद आहिरे,म्हसु आहिरे,सागर आहिरे,रामनाथ आहिरे,मंगेश आहिरे,सोमनाथ आहिरे,किशोर आहिरे,बबन आहिरे ,नवनाथ आहिरे,रघुनाथ आहिरे, गोरख आहिरे,विनोद आहिरे,संजय आहिरे,दौलत आहिरे सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

