शेतीचा शोध हा ‘बाई’ ने लावला :
‘कोरोमंडल’तर्फे शेतकरी महिलांना मार्गदर्शन
जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून तळवाडे, ता चांदवड या गावातील महिला शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भारतातील महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. ग्रामीण भागात शेतकरी महिला यांचा वाटा महत्वाचा असून त्यांचा योग्य सन्मान व्हावा व प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी या उदात्त हेतूने कोरोमंडेल इंटरनेशनल ली. या कंपनी मार्फत महिला शेतकर्यांना शेती विषयी माहितीपर मार्गार्शन केले. कोरोमंडेल कंपनीचे झोनल मेनेजर समाधान बुधवंत, विपणन अधिकारी अमित खांदे, कृषीअभ्यासक विक्रम कापसे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.
नेनो टेक्नोलॉजीचे महत्व पटवून देताना नेनो डी.ए.पी., नेनो युरिया व सेद्रिय खतांचे महत्व समजावून सांगितले.
“कोणते हि तंत्रज्ञान आत्मसात करताना शिक्षण आवश्यक असते. त्याबरोबर अनुभव देखील महत्वाचा असतो. पुरुषांच्या बरोबरीने महिला मातीत राबतात, त्यामुळेच शेतीचा शोध हा ‘बाई’ ने लावला असल्याचा कयास सांगितला जातो”
असे वक्तव्य किरण ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
सेंद्रिय खत N RICH निंबोळी, सेंद्रिय कार्बन असलेले कार्बन प्लस व के रिच पोटाश याविषयी देखील परिपूर्ण मार्गदर्शन कोरोमंडेल कंपनी प्रतिनिधी किरण ठाकरे यांनी केले. तसेच त्याचे प्रात्यक्षिक शेतावर करून दाखवले.
“जुन्या व नवीन तंत्रज्ञांचा अवलंब करून शेतीत मोठी सुधारणा करता येऊ शकते” असे प्रतिपादन कार्याक्रमच्या अध्यक्षा सगुणा विकास जाधव यांनी केले, यावेळी वैशाली ठाकरे, भाग्यश्री चव्हाण, अनिता ठाकरे, समृद्धी ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार नंदा ठाकरे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी बेबीबाई पवार, सारिका जाधव,जयश्री चव्हाण, निर्मला सवंद्रे, हिराबाई चव्हाण, सुनिता वाघ, ऋतुजा जाधव, अनिता जगताप, अनिता चव्हाण तसेच ग्रामस्थ शेतकरी महिला उपस्थित होत्या.


