लाडकी बहीण योजनेसारखी अजित दादांनी एक क्रांतिकारी योजना आणली चांदवडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेप्रसंगी खा. सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

लाडकी बहीण योजनेसारखी अजित दादांनी एक क्रांतिकारी योजना आणली आहे. मुलींना मोफत शिक्षणामुळे काबाडकष्ट करणाऱ्या गरिबांच्या घरची भगिनी ही उच्च पदावर जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेवर गैरसमज पसरवण्याचे काम महाविकास आघाडी तर्फे जाणीवपूर्वक केले जात आहे. येत्या 17 तारखेला अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहे. तसेच शेतीला वीजपुरवठा मोफत करणार आहे .मागील थकबाकी भरायची नाही व पुढील किमान पाच वर्षे तरी विज बिल भरायचे नाही. अजितदादांनी चांगला अर्थसंकल्प मांडला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत सहा ठिकाणी झालेल्या यात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चांदवड तालुक्यात यात्रा येत असल्याने अजितदादा जरी कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले असले तरी माझ्या तालुक्यात जनस्वराज्य यात्रा आलीच पाहिजे यासाठी तालुकाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर यांनी भूमिका घेतली. व यात्रा यशस्वी करून दाखवली. असे प्रतिपादन चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाप्रसंगी तो तुळसाई लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की बोली भाषेचा विचार केला तर अहिराणी भाषेचे प्रवेशद्वार हे चांदवडला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये मी मंत्री असलो तरी आजही माझी आई शेतात निंदायला जाते. वडील नोकरीला असताना मी ही चांदवड मध्ये दोन वर्षे राहिलो आहे. अनेक वेळा रेणुका मातेचे दर्शन घेतो मात्र मंत्री झाल्यावर आज पहिल्यांदा दर्शन झाल्याने आनंद वाटतो. अजित दादांनी भावांचाही व बहिणींचा सन्मान ठेवला आहे. म्हणून जन सन्मान यात्रा आयोजित केले आहे .मंत्री आदिती तटकरे योजना यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रूपालीताई चाकणकर यांनी महायुती सरकारने माझ्या महिला भगिनींसाठी ज्या काही योजना आणली आहे त्यामुळे निश्चितच महिलांचा सन्मान होणार आहे .माझ्या राजकारणाची सुरुवात बचत गटापासून झालेली आहे .अजित दादांनी बचत गटांच्या अनुदानात वाढ केली.

राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी तालुक्यात जनसन्मान यात्रा यशस्वीपणे राबवणाऱ्या तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व कार्यकारणी तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले .यावेळी प्रास्ताविक करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रघुनाथअण्णा आहेर यांनी सांगितले की चांदवड तालुक्यात अजित दादांना मानणारा मोठा वर्ग आहे. चांदवड विधानसभेची जागा ही महायुतीत भाजपाकडे जाणार असल्याने अनेक जण समोरच्या गटात थांबले आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर अजित दादांना मुख्यमंत्री पदासाठी एक हक्काचा आमदार देऊ असे सांगितले. तसेच लाडक्या बहीण योजनेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी चांदवड तालुक्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती यू . के. आहेर यांनी केले. यावेळी अनेक नागरिकांनी आपापल्या समस्यांचे निवेदन खासदार तटकरे यांना दिले. चांदवड तालुका खरेदी विक्री संघातर्फे ही खासदार तटकरे यांना निवेदन देण्यात आले.कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, प्रशांत कदम प्रेरणा बलकवडे, उदयकुमार आहेर ,चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष अनिल काळे ,चांदवड तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर ,देवळा तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ, सुनील तात्या कबाडे,माजी सभापती यू के आहेर, आर.डी.थोरात,गोकुळ देवरे, दशरथ ठाकरे, नंदकुमार मंडलिक, नितीन गांगुर्डे, जावेद काद्री, बाळासाहेब मावळे , सुरेश गांगुर्डे,ज्ञानेश्वर पगार, खरेदी विक्री संघाचे संचालक रवींद्र ठाकरे, राजेंद्र ठाकरे, विजय कुंभार्डे ,रवींद्र शिंदे ,मधुकर गोसावी,शांताराम गांगुर्डे, प्रकाश सोनवणे, देविदास सोनवणे, गोटीराम सोनवणे, भूषण गांगुर्डे, विक्रम गांगुर्डे, दत्तू पगार, अंबादास ठोंबरे, किरण आहेर, वैभव आहेर गणेश आहेर, हर्षद काळे, भाऊसाहेब गांगुर्डे , भाऊसाहेब जाधव यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी खा. सुनील तटकरे यांचा सत्कार रघुनाथ अण्णा आहेर यांनी तर नामदार अनिल पाटील यांचा सत्कार अनिल काळे व सुनील तात्या कबाडे यांनी केला.

