सुभाष कामडी.मु ,वांगण सु ता. सुरगाणा
किशोर पाठक : स्वागतशील कवी
मराठी कवितेच्या दालनात गेली सहा दशके अधिराज्य गाजवणारे कवी किशोर पाठक यांचे मागे आठ महिन्यांपूर्वी म्हणजे २१ मार्च २०२० रोजी दुःखद निधन झाले ह़या बातमीने महाराष्ट्राच्या साहित्याच्या क्षेत्रात शोककळा पसरली होत त्यांना समर्थनार्थ ही माहिती.
खरेतर नाशिक भागातील मराठी साहित्य क्षेत्रात साहित्यीकांच आजही मोठं योगदान आहे ते म्हणजे कवी वि दा सावरकर ते आज पर्यंत त्यातील कुसुमाग्रज हे तर नाशिकच नाही तर साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत कवी किशोर पाठक हे कवी वि वा शीरवाडकर यांच्या नंतरचे आधुनिक कालखंडातील महत्त्वाचे कवी शीवाय ते संत साहित्याचे अभ्यासक लेखक डॉ यशवंत पाठक यांचे कनिष्ठ बंधू होते आधुनिक युगात १९७५ मध्ये त्यांनी काव्य लेखनाला सुरुवात केली १९७९ मध्ये त्यांचा पाळत नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्याला प्रस्तावना कुसुमाग्रजांनी लिहिली ते एक सौंदर्यवादी भावकविताकार म्हणून ओळखले जात राजकीय विकार बाजूला सारून संवेदनशील मनाने सामाजिक माणसं आणि नैसर्गिक जाणिवा यांचे बदलते कंगोरे काव्यसंग्रहातून रेखाटले आहे त्यांचे कथासंग्रह पण तितकेच महत्वाचे आहे त्यात ते समाजातील बदलत गेलेल्या मुल्य ह्रासाबदल बोलतात याखेरीज मराठी भाषेवर त्यांचे विपुल प्रेम होते ते भाषेविषयी ते म्हणतात , मराठीतून बोला , मराठीतून चाला, मराठीतून दर्या शीवी शाप ही रचना आजच्याही मराठी साहित्य वाचकाला भाषेवर प्रभुत्व निर्माण करणारी आहे , साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे बा सी मर्ढेकर, केशवसुत, ना घ देशपांडे, यांसारखे वाड्मयीन पुरस्कार तसेच महाराष्ट्रातील इतर संस्थाचे पुरस्कार देखील मिळाले त्यांचे प्रकाशित साहित्य , काव्यसंग्रह १ पाळत २ बेचकित जन्मतो जीव ३ चुळुक बुळुक ४ शुभ्र कोवळे आभाळ गाणे ५ सम्भवा ६ झुळ झुळ झरा याशिवाय कथासंग्रह १ काळा तुकतुकीत उजेड २ जीर्ण रेषांच्या खाली ३ मिटल्या पानांची झाड याशिवाय अंतस्वर हे नाटक प्रकाशित आहे हा छोटासा लेख मराठी साहित्य वाचकांच्या माहितीसाठी आहे
-सुभाष कामडी.मु ,वांगण सु ता. सुरगाणा

