[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद जाहिरात विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

‘माती मागतेय पेनकिलर’ या कविता संग्रहावर कवी वीरधवल परब यांनी केलेले भाष्य

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

‘माती मागतेय पेनकिलर’ कवी सागर जाधव जोपुळकर

सागर जाधव जोपुळकर यांचा पहिला कवितासंग्रह माती मागतेय पेनकिलर (अथर्व पब्लिकेशन्स, धुळे) “गावखेड्यांना गिळंकृत करू पाहणाऱ्या नवभांडवलशाही व्यवस्थेचं अधोरेखन” करतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या २०२४ च्या विशाखा काव्यपुरस्काराने सन्मानित हा संग्रह पाच छेदकांत (ह्युमिकशिवाय वाढत नाहीत मुळ्या, वाऱ्यावर फडफडणारा रंगीत झेंडा, स्वत:वर फॉस्पेटचा स्प्रे मारून घेताना, हृदयावर कोरून ठेवलेल्या सजीव लेण्या, शून्यातून वजा झाल्यावर उरलेली इन्फेनिटी) विभागलेला आहे.

“ग्रामीण भारतातील सामाजिक-आर्थिक बदलांचे सूक्ष्म निरीक्षण सादर करतो.” शेतजमिनीचे प्लॉटकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भाऊबंदकी, शेणाच्या वासाचा शहरी उमाळा, मॉल संस्कृती अशा विषयांवर उपरोधिक शैलीत भाष्य करत “शेतीमातीच्या दु:खभोगवट्याची” कथा सांगतो. ह्युमिक अॅसिड, अॅम्यूनिटी यांसारख्या वैज्ञानिक-व्यावसायिक प्रतिमा ग्रामीण जीवनाच्या सत्वाकडे “लक्ष वेधतात”.

इंग्रजी शब्दांचा सढळ वापर “अनाठायी वाटला” तरी उपरोधिकता टोकदार करतो. “नवखेपणाच्या या काही दोषांकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही.” कवीच्या “भवतालाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आस्थेचा आहे”; प्रक्षोभ खरा आहे. “आपल्या अवतीभवती सिमेंटचे दगड अजूनही वाढत जातील” याची जाण ठेवत पुढील कवितेत सखोलता येईल असा विश्वास. शुभेच्छा!.”

वीरधवल परब,

वेंगुर्ले,  सिंधूदुर्ग,

7796445586

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या