चांदवडच्या कसदार मातीतला ‘हिरवा अंकुर’ : सागर जाधव जोपुळकर
त्यात झाड होण्याच्या सगळ्या शक्यता मौजूद आहे; अन तो ‘झाड’ होणार ! असं तसं नाही तर चौहुबाजूने बहरणारं, हिरवंकंच झाड. तो कविता लिहित नाही. कविताच त्यास लिहून घेते. कवितेनं त्यास लिहून घेतल्यामुळे त्यास आपण कवी म्हणतो. त्या कवीचं नाव आहे ‘सागर जाधव जोपुळकर’
शिक्षकाला गुणी विद्यार्थी भेटला की शिक्षकाच्या अध्यापनाला खरा बहर फुटतो. तसाच मला कवितेच्या क्षेत्रात हा अतिशय गुणी कवी सापडला आहे. स्वत:तली निरागसता जपत वास्तवाला भेदणं तसं अवघड काम मात्र याने आपल्यातली निरागसता तरोताजा ठेवत आपल्यातल्या कवीला सक्षम केलं आहे. काळाच्या ओघात जराही ‘निरागसता’ कमी होऊ दिली नाही. हे त्याचं माणूस म्हणून यश आहे. याचाच फायदा त्याच्यातल्या कवीला झाला आहे.
त्याचं चिंतन दाट. विचार प्रखर. अन समाजातील अराजकतेचे अन व्यवस्थेच्या करणीचे सूक्ष्म एक्सरे तो काढतो. म्हणूनच मातीची हाक त्यास कळलीय. ‘माती मागतेय पेनकिलर’ हे त्यासंच कळू शकतं. अतिशय ताकदीने तो कागदावर व्यक्त झाला. त्या व्यक्त होण्याचं एकत्रित शीर्षक धारण करून त्याचा ‘माती मागतेय पेनकिलर’ मराठी काव्यप्रवाहात दाखल झाला आहे. कृषीवलाचं वर्तमान जगणं त्याच्या कवितेतून अतिशय ताकदीनं आलं आहे. हा कवी वाचायलाच हवा.
- ऐश्वर्य पाटेकर
कवितासंग्रह: माती मागतेय पेनकिलर
कवी: सागर जाधव जोपुळकर
प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन्स
पाने: १२०
किंमत: 160/- रु.
संपर्क: 9404805068
■ ऐश्वर्य पाटेकर सरांच्या fbची लिंक :
https://www.facebook.com/share/p/NWLbvc19LoRr7Jnm/?mibextid=oFDknk
■ घरपोच मागवण्यासाठी :


