[masterslider id="2"]
काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात मुख्य बातमी लेख संमिश्र वार्ता हितगुज

‘माती मागतेय पेनकिलर’ — शेतीमातीतून उसळणाऱ्या वेदनेचा करुण स्वर

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

मराठी–इंग्रजी शब्दांचा सुंदर समन्वय, ग्रामीण बोलींचा सहज वापर, आणि मुक्तछंदापासून अभंगापर्यंतची विविध छटा या संग्रहाला वेगळं रूप देतात. अथर्व पब्लिकेशन्सचे आकर्षक पुस्तक आणि अरविंद शेलार यांचे बोलके मुखपृष्ठ व विष्णू थोरे यांचे आतली चित्रं संपूर्ण संग्रहाला उठाव देतात.

✨ ‘माती मागतेय पेनकिलर’ — शेतीमातीतून उसळणाऱ्या वेदनेचा करुण स्वर ✨

“धरतीला बोअरवेलने चिरताना, विहिरी फोडताना ती वेदनेनं कण्हते—आणि हेच वास्तव ‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहात ठसठशीतपणे उमटलेलं दिसतं. कवी जरी चार बुकं शिकलेला असला तरी जमिनीशी त्याची नाळ घट्ट आहे; आणि सभोवतालच्या चांगल्या–वाईट घटनांनी तो व्यथित होतो, म्हणूनच कविता हे त्याचं योग्य माध्यम ठरतं. शीर्षक कविता वाचताच शेतकऱ्याचं भयाण वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं ‘फॉस्फरस सोडला बुडाला / वेदनेचा झाला गर्भात जाळ / माती मागतेय पेनकिलर’ आधुनिकतेच्या नावाखाली मातीला ओरबाडलं जातंय; वाढत्या नागरीकरणामुळे सिमेंटची जंगले उगवतायत, ही शोकांतिका कवीने अत्यंत प्रभावीपणे टिपली आहे.

गीतकार सोमनाथ पगार यांनी माती मागतेय पेनकिलर या कविता संग्रहावर दीर्घ लेखन केले आहे, त्याचा संक्षिप्त भाग

कवी वैयक्तिक पातळीवर थांबत नाही; तो समकालीन जगण्याच्या विसंगती, आंतर्विरोध, संभ्रमित भोवतालावर भाष्य करतो—म्हणूनच या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. मराठी–इंग्रजी शब्दांचा सुंदर समन्वय, ग्रामीण बोलींचा सहज वापर, आणि मुक्तछंदापासून अभंगापर्यंतची विविध छटा या संग्रहाला वेगळं रूप देतात. अथर्व पब्लिकेशन्सचे आकर्षक पुस्तक आणि अरविंद शेलार यांचे बोलके मुखपृष्ठ व विष्णू थोरे यांचे आतली चित्रं संपूर्ण संग्रहाला उठाव देतात.
माती मागतेय पेनकिलर हा संग्रह फक्त ‘शेती’ नव्हे—तर पोस्टमॉडर्न ग्रामीण, मध्यमवर्गीय वाताहतीची व्याकूळ कहाणी आहे. संवेदनशील कवीमनाचा सूक्ष्म प्रक्षोभ यात आहे. वाचक सहज खिन्न होतो, अंतर्मुख होतो, प्रश्नांशी भिडतो, कारण कविता वैयक्तिक न राहता जागतिक अराजकतेचं चित्र उभं करतात. या संग्रहातील कविता दर्जेदार, आशयगर्भ आहेत; त्यामुळे कवी सागर जाधव (जोपुळकर) यांनी साहित्य क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केलं आहे.”

— गीतकार सोमनाथ पगार
(कारुण्यबोध काव्यसंग्रहाचे कवी)
(नाशिक)

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या