[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद जाहिरात विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माती मागतेय पेनकिलर कविता संग्रहावर कवी लक्ष्मण महाडीक यांनी केलेलं भाष्य

यांनी लिहिलेले कोमल जगझाप

माती मागतेय पेनकिलर

“युवाकवी सागर जाधव जोपुळकर यांच्या समग्र कवितेचा जन्म ही अस्वस्थतेतून झालेली एक प्रामाणिक, जिवंत प्रक्रिया आहे. शेतीमातीच्या दाहक वेदनेला शब्द देणारी ही कविता म्हणजेच कास्तकराच्या जखमेवरचं पेनकिलर. ग्रामीण वास्तवाच्या अवकाशात उभा असलेला, कास्तकरीच्या घरात वाढलेला कवी, मातीशी असलेली नाळ सांभाळत जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या कवितेतून मातीची ओलही येते, आणि तिची तप्त भळभळही. मातेच्या दु:खाची वेणा समजणं सोपं असतं; पण मातीच्या दुखाच्या गहिऱ्या वेदना समजण्यासाठी जे संवेदनशील मन लागतं, ते या कवीकडे आहे. कवितेत आक्रोश आहे गार्हाणाऱ्या गाईगुरांचा, गर्भार मातीचा, पाण्याअभावी रडणाऱ्या विहिरींचा, कर्जाने वाकलेल्या कुणब्याचा, आणि स्वप्नांच्या चिखलात अडकलेल्या पिढ्यांचा.” ही कविता म्हणजे ‘एन.ए.’ होणाऱ्या मातीची कहाणी, स्वत्व हरवलेल्या ग्रामीण संस्कृतीचा हुंकार, आणि शेतीच्या तळमळीचा दाहक अविष्कार.  सागर जाधव जोपुळकर यांची कविता सर्वस्पर्शी आहे आणि वैश्विकतेकडे वाटचाल करणारी आहे. त्याच मातीतल्या साहित्य अकादमीचा प्रथम युवा पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या पाठोपाठ मराठी ग्रामीण साहित्य विश्वाच्या क्षितिजावर नक्कीच विराजमान होईल. ग्रामीण साहित्यविश्वाच्या क्षितिजावर हा कवी निश्चित विराजमान होईल.”

प्राचार्य लक्ष्मण महाडिक
पिंपळगाव बसवंत

लेखकाबद्दल

कोमल जगझाप

एक टिप्पणी द्या