[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड बाजार समितीत दुस-या दिवशी झेंडू फुले लिलावास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड बाजार समितीत दुस-या दिवशी झेंडू फुले लिलावास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद.

चांदवड बाजार समितीचे मुख्य बाजार आवार,चांदवड येथे दरवर्षी नवरात्र व दिपावली उत्सवात झेंडू फुलांचे हंगामी स्वरुपात लिलाव केले जातात. त्यानुसार बाजार समितीचे आवारावर सोमवार दि.03/10/2022 पासुन झेंडू फुलांचे लिलाव सुरु करण्यात आलेले आहेत.


दरम्यान लिलावाच्या दुस-या दिवशी 3500 क्रेटस झेंडुच्या फुलांची आवक झालेली असुन त्यात लाल झेंडूच्या फुलास प्रति क्विंटल 1250 ते 5000 सरासरी 4000 व पिवळा झेंडूस 1800 ते 5500 सरासरी भाव 4200/- रुपये मिळाले. यावेळी तालुक्यातूनच नव्हे, तर बाहेरील तालुक्यातून देखील शेतक-यांनी फुले विक्रीस आणलेली होती. बाजार समितीचे कार्यक्षेत्रामध्ये जोडशेती म्हणुन झेंडू फुलांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. परंतु फुल उत्पादन झालेनंतर शेतक-यांसमोर फुले विक्रीसाठी मोठा पेच पडायचा, तसेच फुले विक्री करतांना शेतक-यांची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणुक होत असे. याकरीता बाजार समितीने 5 वर्षांपासुन हंगामी झेंडूच्या लिलावास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील पहिला फुलांचा लिलाव करणारी बाजारपेठ म्हणुन चांदवड बाजार समिती ओळखली जाते. बाजार समितीच्या आवारावर झेंडू फुलांना प्रतिनुसार योग्य बाजारभाव मिळाल्याने शेतक-यांना बाहेर फुले विक्री करण्याची आवश्यकता भासली नाही, त्यामुळे चांदवड बाजार समितीत शेतक-यांचा फुले लिलावास उत्कृष्ठ प्रतिसाद लाभला. मात्र यावर्षी अतिवृष्टी, खराब हवामान या कारणास्तव झेंडू फुलांचे उत्पादन कमी झालेले आहे. तसेच मागील महिन्यातील पाऊसामुळे झेंडू फुलांचे नुकसान होईल, अशी शेतक-यांना चिंता होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने फुलांचे उत्पादन चांगल्या दर्जाचे होत आहे.
या वर्षी बाजार समितीत फुले खरेदीसाठी मुंबई, कल्याण, गुजरात, दादर, नाशिक येथील व्यापारी उपस्थित राहत असुन दिपावली उत्सवात दि.22/10/2022, दि.23/10/2022 या दिवशी दु.04.00 वा.व दि.24/10/2022 रोजी सकाळी 08.00 वा. फुलांचे लिलाव सुरु राहणार आहेत.


फुले विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यात येत असुन फुले मोकळ्या स्वरुपात किंवा क्रेटसमध्ये मोठ्याप्रमाणात विक्रीस आणावा, फुले विक्री संदर्भात काही सुचना अगर तक्रार असल्यास त्वरीत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक श्रीमती प्रेरणा शिवदास व सचिव श्री. गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या