[masterslider id="2"]
अध्यात्मिक राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

श्री गुरुदत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण व भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

श्री गुरुदत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण व भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न

आडगाव रेपाळ (वार्ताहर): सालाबाद प्रमाणे याही वर्षी आडगाव रेपाळ तालुका येवला येथे श्री गुरुकृपेने व साधुसंतांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी ह भ प जयराम महाराज आडगावकर व वैकुंठवासी संत मौनगिरी भागिनाथ बाबा माळेगावकर यांच्या प्रेरणेने तसेच ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी सात दिवस काकडा भजन हरिपाठ,श्रीमदभागवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त प्रसिद्ध भागवत कथाकार भागवताचार्य ह.भ.प.सुधाकर महाराज शास्त्री त्र्यंबकेश्वर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
या कथेत श्रीमद् भागवत महात्म्य,गोकर्ण उपाख्यान, भागवताचे प्रयोजन ,नारद चरित्र ,परीक्षित जन्म, भीष्मप्रयान ,परीक्षिेत शाप, सृष्टी वर्णन, वराह अवतार, कपिल अवतार ,सती ध्रुव चरित्र ,प्रल्हाद चरित्र ,गजेंद्र मोक्ष ,वामन अवतार, राम जन्म ,कृष्ण जन्म महोत्सव, श्रीकृष्ण बाललीला ,पुतना उद्धार ,गोवर्धन पूजा, रासलीला, मथुरा गमन ,कंस उद्धार, रुक्मिणी स्वयंवर श्रीकृष्ण सुदामा चरित्र ,परीक्षित मोक्ष आणि कथा सांगता याप्रमाणे कथेचे निरूपण केलं

यावेळी महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून भागवताचं निरूपण सहज सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत केलं त्यामुळे कथेला उत्तरोत्तर रंग भरत गेला आणि कथेसाठी मोठी गर्दी होत होती यावेळी श्री गुरुदत्त जन्माचे ह.भ. प.अंबादास महाराज जगताप यांचे कीर्तन संपन्न झाले तसेच सात दिवस कथा संपन्न झाल्यानंतर शेवटी ह.भ.प. शिवाजी महाराज गायके यांच्या काल्याचे किर्तनाने कथेची सांगता झाली कथेसाठी समस्त ग्रामस्थ व ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या