[masterslider id="2"]
राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पगार कुटुंबीयांना ‘ एक हात मदतीचा ‘. उपक्रमाद्वारे सहाय्य.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

लहान मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून छोटासा उपक्रम राबविण्याचा आला होता. या कुटुंबाला मदत म्हणून 27000 रुपयांचा निधी देण्यात आला.

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पगार कुटुंबीयांना ‘ एक हात मदतीचा ‘. उपक्रमाद्वारे सहाय्य.

चांदवड प्रतिनिधी – चांदवड तालुक्यातील दरेगाव गावात जिजाबाई नामदेव पगार यांचे नुकतेच निधन झाले होते. या कुटुंबावरच काळाने झडप घातली. गेल्या वर्षी पासून पगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबप्रमुख नामदेव किसन पगार यांचे कोरोनात निधन झाले .त्यानंतर लगेच त्यांचा एकुलता एक मुलगा भागा नामदेव पगार यांचे आजारामुळे निधन झाले .मुलाला एक वर्षही होत नाही तर मंगळवारी जिजाबाई नामदेव पगार यांचे निधन झाले. त्यामुळे या कुटुंबात करते पुरुष व कमावते हात काळाने हिरावून घेतल्याने कै. भागा पगार यांच्या तीन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे व कुटुंबाची जबाबदारी वनिता भागा पगार या महिलेवर आली आहे .अशा वेळेस एक समाजाचं देणं म्हणून आपण अशा कुटुंबाच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहणं ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी एक हात मदतीचा हा छोटासा उपक्रम राबविण्याचा मानस काहींनी व्यक्त केला व त्यास अनुसरून ज्याला या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी मदत करण्याचे आवाहन व्हाट्सअप ग्रुप द्वारे करण्यात आले होते प्रतिसाद देऊन आपापल्या परीने सहयोग दिले. सोसायटीचे माजी चेअरमन संजय गांगुर्डे व विक्रम देवरे यांनी सदर मदत कार्य करण्याचे आवाहन केले. एक हात मदतीचा… हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला .

वनिता भागा पगार या महिलेच्या लहान मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून छोटासा उपक्रम राबविण्याचा आला होता. या कुटुंबाला मदत म्हणून 27000 रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी संजय गांगुर्डे , विक्रम देवरे , पो . पा . सोमनाथ गांगुर्डे , अनिल गव्हाणे , सुधाकर धिवर सर, विक्रम पगार , दत्तु पगार आदी उपस्थित होते . या उपक्रमात योगदान देणाऱ्यामध्ये बी.एस.व्हडगर(सचिव) , संजय बाबाजी गांगुर्डे ,भाऊसाहेब रामदास देवरे (पुणे) , अर्जुन श्रावण गव्हाणे, प्रविण अशोक देवरे . सोमनाथ बबन गांगुर्डे (पोलीस पाटील) ) विक्रम कारभारी देवरे ,हिरामण दादाजी शेळके ,पवन अशोक गरुड ,रामदास बाबुराव गांगुर्डे ( महाराष्ट्र पोलीस नाशिक). दादाजी उत्तमराव अहिरे सर (नाशिक) सुधाकर शंकर धिवर (सर ) , अर्जुन श्रावण गव्हाणे , अशोक पोपट गागुडेऺ यांनी सदर कुटुंबाला मदत केली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या