चांदवडी रुपय्या पुरस्कार जाहीर
साहित्य प्रेरणा पुरस्कार कवयित्री जयश्री वाघ यांना तर सामाजिक प्रेरणा पुरस्कार छ. शंभू राजे ग्रुपला
चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ दरवर्षी समाजातील कार्यशील घटकांचा सन्मान करत असते. ‘चांदवडी रूपय्या’ मंडळाच्या वतीने दर वर्षी दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देत असलेले आणि ज्यांची प्रेरणा समाजातील इतर घटकांनी घ्यावी अशा नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवयित्री जयश्री वाघ यांना “चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा चांदवड येथील छत्रपती शंभूराजे परिवार या ग्रुपची त्यांनी डोंगरमाळावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे, दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम व इतर कार्याबद्दल त्यांना “चांदवडी रुपय्या सामाजिक प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार निवड समितीत शांताराम हांडगे, जनार्दन देवरे, प्रतिभा खैरनार, रवींद्र केदा देवरे, हर्षल गांगुर्डे, संदीप गुजराथी, वाल्मिक सोनवणे, शिला नरहरी पाटील यांनी काम बघितले.
चांदवडी रुपय्या मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कविता लेखन स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर केले जातील. पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असणार आहे. पुरस्कार, पारितोषिके व काव्य स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळाच्या आगामी वार्षिक कार्यक्रमात केले जाईल, असे चांदवड रुपय्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब जाधव व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी सांगितले

