[masterslider id="2"]
मुख्य बातमी

चांदवड येथे 1 सप्टेंबरला पाणीप्रश्नी सर्वपक्षीय बैठक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड येथे 1 सप्टेंबरला पाणीप्रश्नी सर्वपक्षीय बैठक

चांदवड तालुक्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी प्रश्न कायम दुष्काळी हा शिक्का चांदवड तालुक्यावर पडलेला आहे गेले ४०,५० वर्ष पाण्यावर बऱ्याच निवडणूका पार पडल्या परंतु हा प्रश्न सुटलेला नाही यासाठी उशीरा का होईना परंतु तालुक्यातील जनता जागी होतेय यासाठी विविध पक्षातील नेते एकत्र येऊन पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे.ज्यांना यामध्ये राजकारण वाटतेय त्यांनी बाजुला राहावे परंतु खोडा घालण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहनही आयोजकांनी केले.

यासाठी संपूर्ण तालुक्यातील सर्व शेतकरी,पक्षीय नेते,आजी माजी पदाधिकारी, सर्व सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी तरुण वर्ग तसेच पत्रकार बंधू यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की येणाऱ्या १ सप्टेंबर २०२४ रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे आपण सर्वांनी या बैठकीत उपस्थित राहुन पुढील दिशा ठरविण्यासाठी व पाणीप्रश्न लढा उभारण्यासाठी आपले मुद्दे विचार मांडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर बैठक दिनांक १ सप्टेंबर २०२४
सकाळी १०:०० वा.
शासकीय विश्रामगृह गणुर चौफुली चांदवड येथे होणार आहे. या बैठकीत चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्न तापण्याची शक्यता आहे. नार पार प्रकल्पात चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याच्या वृत्ताने पाणी प्रश्नाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील गोदावरी खोरे व पूर्व भागातील तापी खोऱ्यातील गावांना पाणी कसे आणता येईल या संदर्भात दिशा ठरवली जाणार असून शासन दरबारी या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या