[masterslider id="2"]
मुख्य बातमी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांनी केल्या तालुका निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांनी केल्या तालुका निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित (दादा) पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. खासदार समीर (भाऊ) भुजबळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज (दादा) चव्हाण यांच्या मान्यतेने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी तालुका निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक हे प्रत्येक तालुक्यात दौरा करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तालुका कार्यकारिणी, बूथ कमिटी करण्यावर भर देणार असून गाव तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विकास कामे गावोगावी पोहचाविण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी माहिती दिली आहे.
*नवनियुक्त तालुका/शहर निरीक्षकांची यादी पुढील प्रमाणे..*
१) दिपक जोरवर – सुरगाणा तालुका
२) हर्षल इथापे – निफाड तालुका
३) गणेश पगार – बागलाण तालुका
४) वैभव पवार – देवळा तालुका
५) नवनाथ शिल्लक – चांदवड तालुका
६) ऋषिकेश चव्हाण – पेठ तालुका
७) महेंद्र सानप – येवला तालुका
८) जावेद मोमीन – निफाड पूर्व
९) समाधान आहेर – दिंडोरी तालुका
१०) मेघदिप सावंत – मालेगाव पूर्व
११) महेश गादेकर नांदगाव
१२) मनोज पांडव – कळवण
१३) प्रसाद दळवी मालेगाव बाह्य
१४) उमेश सांगळे – पिंपळगाव शहर
१५) सागर कर्डिले – येवला शहर
१६) विशाल परदेशी – नांदगाव/मनमाड शहर
१७) अमोल गांगुर्डे – चांदवड शहर

लवकरच तालुका निरीक्षक दौरा पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करतील व तो जिल्हा कार्यालयात पाठवतील त्यानंतर जिल्हाध्यक्ष चेतन कासव प्रत्येक तालुका वार जिल्हा दौरा करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या