ल.पा तलाव राहुड डोंगरगाव उसवाड कोकण खेडे पर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे ह्या कामासाठी २६ कोटी ३७ लक्ष रुपये निधी मंजूर आ.डॉ.राहुल आहेर

ल.पा.तलाव राहुड,डोंगरगाव,उसवाड व कोकनखेडे पर्यंत बंदिस्त पाईपलाईन व भूमिगत कालवा तयार करणे ह्या कामासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २६ कोटी ३७ लक्ष रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल आहेर यांनी दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सदर कालव्या साठी एक मीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येणार असून एकूण लांबी १४ किमी राहणार आहे. 0/00 ते 0६/00 किमी उसवाड पाझर तलावा पर्यंत आणि उसवाड पाझर तलावापासून पुढे 06/00 ते 14/00 किमी जुन्या पाझर तलाव कोकणखेडे पर्यंत नवीन पाईपलाईन होणार आहे. यामध्ये तीन नवीन गेट ( हेड रेगुलेटर), पाणी सोडण्यासाठी पाच ठिकाणी आउटलेट होणार आहे. पावसाचे पाणी आत मध्ये घेण्यासाठी तीन ठिकाणी इनलेट राहणार आहे. ११ ठिकाणी फॉल राहणार आहे. दुरुस्तीसाठी २६ ठिकाणी पाईपलाईन ला मॅन होल्ड राहणार आहे जिथे गरज असेल तिथे रस्ते आणि रोड क्रॉसिंग पण होणार असल्याने त्याचा फायदा राहून उसवाड डोंगरगाव कोकण खेडे दुगाव या सर्व गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच किमी 0/00 ते किमी 06/00 पासून डोंगरगाव हिंदोळा पाझर तलावा पर्यंत नविन पाईप लाईन असणार आहे.या आधी कालव्यावर असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उपाळायच्या किंवा अन्य समस्या निर्माण होत त्या सर्व आता या नवीन मंजूर झालेल्या कामामुळे मिटणार असल्याचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली

