दलित वस्त्यांतील रस्ते होणार चकाकच भाऊ चौधरींच्या प्रयत्नातून पहिल्या टप्यातील ५ कोटी रुपयांची मंजुरी

चांदवड तालुक्यातील गावांतील 56 दलित वस्त्यांतील रस्ते चकाचक होणार आहेत. शिवाय अनेक ठिकाणी परिसर सुशोभीकरण,पथदिवे हायमास्ट चे काम होणार असून यातून या वस्त्यांचा चेहरा उजळून निघणार आहे. या विविध विकासकामांसाठी शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्यातील एकूण पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे , उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी दिली.
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव गावचे भूमिपुत्र शिवसेना पक्षात मोठ्या पदावर जबाबदारी संभाळत असताना चांदवड तालुक्यातील विकासकामांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. या आधी चांदवड नगरपरिषद हद्दीतील कामांसाठी ९ कोटी रुपयांची मंजुरी त्यांच्या प्रयत्नांतून मिळाली होती. आता तालुक्यातील खेलदरी, वाकीबुद्रुक, वाकी खुर्द, हिवरखेडे, पाथरशेंबे, उर्धुळ, कोकणखेडे, तळेगावरोही, खडकजांब, नारायणगाव, पाटे, तिसगाव, दरेगाव, भडाणे, पिंपळणारे, भाटगाव, वडनेरभैरव, पुरी, कुंडाणे, गणूर, खडकओझर, बोपाने, दिघवद, सुतारखेडे, कळमदरे, डोंगरगाव, हिरापूर, वाहेगाव, काळखोडे, निंबाळे, रायपूर, वडगावपंगु, दहेगाव, कुंदलगाव, वागदर्डी, साळसाने, दुगाव, कानमंडाळे, भोयेगाव, देवरगाव, कातरवाडी, गंगावे, पन्हाळे, राहुड, वडबारे, शिंगवे, तळवाडे, शिरूर, शिरसाने, शेलू, आसरखेडे, भूत्याने, धोडांबे या 56 गावांतील विविध विकासकामांतून दलीस वस्त्यांचा चेहरा बदलणार आहे. हा निधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे.चांदवड तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाऊसाहेब चौधरी यांचे चांदवड तालुक्यांतील नागरिक व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

