[masterslider id="2"]
मुख्य बातमी

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे राजधेर किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहिम

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे राजधेर किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहिम

ढिगाऱ्याखाली बुजलेल्या राजमार्गाने घेतला मोकळा श्वास सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्यावतीने चांदवड येथील ऐतिहासिक राजधेर किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी काळाच्या ओघात मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजल्या गेलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचा राजमार्ग दुर्गसेवक यांनी श्रमदान करून काही प्रमाणात मोकळा केला.

स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या किल्ले राजधेरचे शिल्लक असलेले अवशेष शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यास नवसंजीवनी द्यावी या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने राजधेर किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित स्वयंसेवकांनी शेकडो वर्षांपासून मातीत बुजलेला मुख्य दरवाजाच्या आड आलेले मोठे दगड व माती वाजूला करून काही प्रमाणात मोकळा केला. गडावरील मुख्य राजमार्गावरील दरवाजा नामशेष होण्यावर आलेला असताना व आपले अस्तित्व काळाच्या ओघात पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजला गेला
होता. दुर्गसेवकांनी हा राजमार्ग काही प्रमाणात मोकळा करीत इतिहास टिकविण्याचा प्रयत्न केला. लवकरच काही दिवसांत पुन्हा संवर्धन मोहीम राबवून दरवाजा पूर्णपणे मोकळा करण्याचा विश्वास दुर्गसेवकांनी व्यक्त केला.आगामी काळात किल्ले राजधेरवरील ऐतिहासिक वास्तू जतन व संवर्धन करण्याची शपथ यावेळी सर्व दुर्गसेवक यांनी घेतली. सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने किल्ले राजधेर येथे संवर्धन मोहिमा घेण्यात येणार असून या मोहिमांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन दुर्गसेवकांनी केले. मोहीम यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या