[masterslider id="2"]
मुख्य बातमी

पक्षनिष्ठा माझ्यासाठी सर्वोच्च; आमदार डॉ. राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील – भूषण कासलीवाल

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

पक्षनिष्ठा माझ्यासाठी सर्वोच्च; आमदार डॉ. राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील – भूषण कासलीवाल

चांदवड प्रतिनिधी – विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तश्या माझ्या अनेक कार्यकर्त्यांकडून मी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करावी अशी मागणी केली जात होती. माझी देखील चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती. तशी मागणी देखील मी पक्षाकडे केली होती. मात्र सर्व्हेचा आधार घेत पक्षाने डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. भारतीय जनता पार्टीची शिकवण माझे वडील स्वर्गीय जयचंद कासलीवाल यांनी माझ्यात रुजवली. म्हणूनच राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या धोरणाला अनुसरून मी माझी भूमिका ही पक्ष निर्णया सोबत असल्याची जाहीर करत असल्याचे प्रतिपादन चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी व्यक्त केले.
आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काल (ता. २९) रोजी महायुती तर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज भरला त्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, संतोष पलोड, बाळासाहेब कासलीवाल, गणपत ठाकरे आदी. उपस्थित होते. पुढे बोलताना भूषण कासलीवाल यांनी पक्षनिष्ठा सर्वोच्च असल्याचे सांगत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना निवडून आणण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांसह कामाला लागलो आहे. यंदा देखील महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल आणि आमदार डॉ. राहुल आहेर तिसऱ्यांदा हट्रिक मारतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. भूषण कासलीवाल यांच्या भूमिकेनंतर आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देखील स्वर्गीय जयचंद कासलीवाल यांच्या विचाराना न्याय देईल असा निर्णय भूषण कासलीवाल यांनी घेतल्याचे सांगत आभार मानले. भूषण कासलीवाल यांचं चांदवड तालुक्यात स्वतःचं एक वेगळ वलय असून नाराजी दूर झाल्याने आमदार डॉ. राहुल आहेर यांची ताकद वाढल्याचे चित्र तालुक्यात आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या