[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

यावल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

यावल वार्ताहर
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
योग शिक्षिका सौ.सुरेखा अशोक काटकर यांनी योगाचे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .शारीरिक, मानसिक, आरोग्य, भावनिक स्थैर्य, श्वासोस्वास या विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. तसेच वेगवेगळ्या आसनांची त्यांनी प्रात्यक्षिके करून घेतली .उपप्राचार्य प्रा. डॉ.एस पी कापडे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. सी के. पाटील यांनी आभार मानले. वरिष्ठ, कनिष्ठ व किमान कौशल्य विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा. मुकेश येवले, प्रा. मनोज पाटील, डॉ. हेमंत भंगाळे, प्रा.अरूण सोनवणे, प्रा. संजिव कदम, श्री. मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे,यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या