[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आदिवासी भागातील जुनी पाणतळी शब्दसंपदा

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी भागातील जुनी पाणतळी शब्दसंपदा

आदिवासी भागातील समाज भाषाविज्ञानाचा अभ्यास केला तर नदी,ओहळातील माशांना अनेक गावरान शब्द आढळून आले आहेत
1. चिचनका ( आकाराने लहाण चपटे तोंडाला खरबाळी मासे )
2. मुरा ( मुरा मासे लहाण व शरीराने हाताला चिकण लागतात)
3. डोख ( आकाराने थोडा मोठा गोलाकार मासा )
4. मळ्या,दांडवन ( आकाराने थोडा मोठा चौकोनी जाड मासा)
5. फुलकुट ( आकाराने थोडा मोठा मासा परंतु त्याला भींग असतात)
6. कोकील ( कोकील हा शब्द सर्वच ठिकाणी वापरला जातो) कोडं पाण्याचे आखडील ढोंगी डोशी चहड – कोकील
7. वादा ( वादा शब्द सगळीकडे वापरला जातो पील्लांना सुरळी म्हणतात)
8. खेकडा (मोठं)- खिराडी
9. छोटे तळे — चोंढ
10. पाण्याचा छोटा प्रवाह — नरा
11. पाणी उपसा करणे — आटवणे
12. नदीकाठी लव्हाळ — गुंदनी
13. पाण्यातील साप – पाणसोळ,पानचिट्टा
14. पाण्यातील झुरळ – दिवस
15. पाण्यातील गाळ – गादा
16. पाण्यातील खाच खळगे – मुरखुंड
17. पाण्यातील मोठा बेडुक – धाबाड
18. पाण्यातील नाकतोडा – तीड
19. पाण्यातील छोटा साप – दिवड
20. पाण्यात बुडून मासे पकडणे – चाफणे
21. पाण्याचा प्रवाह – धोळ
22. पाण्यातील फुगेल पोटाचा छोटा मासा – बाबरडोख
23. नदी – नय
24. ओढा – ओहोळ
मासे पकडण्यासाठी साधणे गरी,
मळी, भोतडी,उदान, खडान,पेंढी दाबणे, भाळी,वरी,कंडाळा असे अनेक शब्द आहेत
_सुभाष नारायण कामडी_ ( _संशोधक)_

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या