[masterslider id="2"]
मुख्य बातमी

चांदवड देवळा मतदार संघात शेतकरी पुत्राचे कडवे आव्हान प्रस्थापित उमेदवारांनी प्रहारच्या गणेश निंबाळकरांचा घेतला धसका गणेश निंबाळकर यांच्यासाठी गावोगावी लोकांकडून मदत निधी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड देवळा मतदार संघात शेतकरी पुत्राचे कडवे आव्हान

प्रस्थापित उमेदवारांनी प्रहारच्या गणेश निंबाळकरांचा घेतला धसका

गणेश निंबाळकर यांच्यासाठी गावोगावी लोकांकडून मदत निधी

निवडणूक म्हणजे गरीबाचं आणि शेतकऱ्याचं काम नाही असं सर्वत्र म्हटलं जातं. पण कधी कधी तुमच्याकडे गाडी बंगला पैसा अडका सोनं नानं पाठीमागे फिरणारे दहा पाच टगे, यातलं काहीही नसूद्या. परंतु जनतेप्रती तुमची काम करण्याची धडपड जर तीव्र आणि प्रामाणिक असेल तर वरील सर्व गोष्टी फिक्या पडतात. आणि जनता संबंधित व्यक्तीला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय चांदवड देवळा विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे. या निवडणुकीत प्रहार कडून प्रथमच गणेश निंबाळकर हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण पोरगा उमेदवारी करत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या गणेश निंबाळकरने पाहता पाहता प्रस्थापित उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केल्याने सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.

चांदवड देवळा मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर महाविकास आघाडी कडून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल तर भाजपातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार केदा आहेर हे प्रस्थापित आणि धनाड्य उमेदवार रिंगणात आहे. तर अजून साध्या मोटरसायकलवरच फिरणारा दहीवद गावचा शेतकऱ्याचा पोरगा गणेश निंबाळकर प्रहार पक्षाकडून प्रथमच उमेदवारी करीत आहे. गणेशच्या रूपाने प्रहार पक्षानेही या ठिकाणी पहिल्यांदाच उमेदवार दिला आहे. डॉ. राहुल आहेर शिरीषकुमार कोतवाल केदा आहेर हे सधन उमेदवार असल्याने प्रचार यंत्रणा राबविण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र या सर्वांच्या समोर प्रहारचा उमेदवार अगदीच तुटपुंजा. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून गणेश निंबाळकरने कांदा प्रश्न, विजेचा प्रश्न, कांदा निर्यातबंदी, पीकविमा, नुकसान भरपाई, बाजार समितीत भेडसावणाऱ्या समस्या, या प्रश्नांवर तीव्र आवाज उठविला प्रसंगी आंदोलनेही केली. शेतकऱ्यांना गणेशची ही आक्रमकता खूपच भावली. या आक्रमकतेतूनच मतदार संघातील जनतेने गणेश निंबाळकरला अनेक गावातील लोकांनी आर्थिक पाठबळ उभे करून दिले. शेतकरी चळवळ बंद पडायला नको, शेतकऱ्याचा आवाज दाबला जायला नको, म्हणून गणेश निंबाळकरला चांदवडसह देवळा तालुक्यातूनही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने प्रस्थापित उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या