युवा दिन साजरा करत शेतीच्या नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न
जोपुळ (ता. चांदवड) येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मतिथीनिमित्ताने युवा दिन साजरा करण्यात आला. जय किसानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेतीत नव्या युगाचा उगम साधण्यासाठी विविध मार्गदर्शनपर चर्चा व संवाद साधण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात मानोत व्यक्त करताना संजय दगुजी जाधव
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव (सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती) यांनी आपल्या भाषणात पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची साथ दिल्यास उत्पादन व गुणवत्ता कशी सुधारेल यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “युवकांनी नॅनो टेक्नॉलॉजीसारख्या नव्या प्रयोगांना अंगीकारले असून, त्यातून शेतीतील आमूलाग्र बदल शक्य झाले आहेत.”

प्रास्ताविक सादर करताना जय किसानचे वृषभसागर पाटील
हवामान तज्ञ दीपक जाधव यांनी हवामान बदलाच्या सावलीत पीक बदल कसा आवश्यक आहे, याची मांडणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार करण्याचे आवाहन केले.

हवामान बदल व पिकांची संगोपन पद्दत समजवून सांगताना दिपक जाधव
पीक सल्लागार जयेश साळुंखे यांनी “नव्या शेती पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते,” असे ठाम मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन जय किसानचे वृषभसागर पाटील यांनी केले.
मंचावर संजय दगुजी जाधव, पंडित जाधव, रवींद्र गोसावी, रमण हरी जाधव, जयेश साळुंखे, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी हितगुज साधताना पिक सल्लागार जयेश साळुंखे
यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तू कोतवाल यांनी कांदा उत्पादन विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच कैलास सावकार, नंदू वाघ यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शेतीतील समस्यांवर व बदलत्या काळातील अपेक्षांवर चर्चा केली.
युवा दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कृषी संवादातून नवी पिढी व पारंपरिक शेती यांच्यातील सेतू बांधण्याचा प्रयत्न झाला, अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

