दरेगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदवड प्रतिनिधी:-
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे ग्रामपंचायत, सोसायटी, माध्यमिक शाळा ,प्राथमिक शाळा, आयुर्वेदिक दवाखाना येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गावातून प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
यावेळी दरेगाव ग्रामपंचायतचे ध्वजपूजन माजी सैनिक रमण गांगुर्डे, ध्वजारोहण सरपंच सरला पवार , सोसायटीचे ध्वजपूजन भाऊसाहेब देवरे, ध्वजारोहण पोलीस दलातील विकास देवरे , विकास माध्यमिक विद्यालयाचे ध्वजपूजन सूर्यकांत गरुड, ध्वजारोहण वाल्मीक देवरे, आयुर्वेदिक दवाखान्याचे ध्वजारोहण माजी सैनिक भिला पगार तर
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक
शाळेचे ध्वजपूजन माजी सरपंच नथु देवरे व दत्तू पगार तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बाबाजी देवरे यांच्या हस्ते करन्यात आले.सालाबादप्रमाणे गावातील अनिल गव्हाणे यांनी आपल्या स्वर्गीय मातोश्री कै सरुबाई गव्हाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता 1 ते 7 वि च्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवन्त विद्यार्थ्यांना रोख स्वरूपातचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला ,त्याच प्रमाणे मुबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दरेगाव चे भूमिपुत्र विकास देवरे व हरितात्या देवरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती दरेगाव, यांनी साई श्रद्धा प्रतिष्ठान अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिकत असणाऱ्या इयत्ता 1 ली ते 7 वि मधील 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 वह्यांचे वाटप केले .
शासकीय आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली व खाऊ वाटप करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ देवरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक छबु गुंजाळ व सुत्रसंचलन साहेबराव देवरे यांनी केले,दिपक निकम् यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाला सरपंच सरला पवार, उपसरपंच सोमनाथ देवरे, चेअरमन विक्रम गांगुर्डे , नथू देवरे, भाऊसाहेब देवरे, कौतिक जाधव ,भाऊसाहेब जाधव,संजय गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे माधव देवरे, रावसाहेब देवरे, शहाजी देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामसेवक भोये, तलाठी पिसोळकर पो. पाटील सोमनाथ गांगुर्डे, विद्यालयाचे मुख्याध्यापक गीते व त्यांचे सर्व शिक्षक व कर्मचारी, हरी देवरे , सागर गांगुर्डे, ज्ञानेश्वर देवरे ,समाधान गांगुर्डे, दत्तू गांगुर्डे,विक्रम पगार, एकनाथ पगार, सोमनाथ देवरे, ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई पगार,वैशाली देवरे , योगिता गांगुर्डे, ताई वाघ, आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

