*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
चांदवड प्रतिनिधी:-
वाद (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाद – वराडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण आहेर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडू गोरसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती पंढरीनाथ खताळ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांवर आधारित संगीत कवायतींनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. यावेळी इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणारी कु.सायली भाऊसाहेब आहेर हिचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
आपल्या प्रभावी वक्तृत्वातून मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून दिले. ध्वजारोहणानंतर अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
या प्रसंगी गावातील मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.ग्रामीण भागातील मुलांना शाळेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडू गोरसे यांनी शाळेसाठी *४३ इंची LED टीव्ही* भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांना मोलाचा हातभार लावला.

